करमाळा (सोलापूर) : करमाळा येथे १४ वर्षाच्या मुलीचा रविवारी (ता. ७) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. साक्षी सचिन सावंत असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ती आठवीमध्ये शिक्षण घेत होती. साक्षीला फुप्फुसाचा त्रास होता. परंतु तो लक्षात आलेला नव्हता.

कालांतराने अधिक त्रास वाढला व तिला पाचव्या वर्षी दवाखान्यात दाखल केले तेव्हा फुफुसाचा त्रास असल्याचे निदान झाले होते. साक्षीच्या मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली असून मृत्यूची माहिती समजताच पोथरे नाका परिसरातील सर्व दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून श्रद्धांजली अर्पण केली. साक्षी करमाळा येथील कर्मवीर अण्णासाहेब विद्यालयात शिक्षण घेत होती.

करमाळा- जामखेड रस्त्यावरील सावंत फार्म हाऊस येथे तिच्यावर अंत्यसंस्कार झाले. साक्षी ही विठ्ठल आप्पा सावंत यांची नात तर सावंत गटाचे नेते सुनिल सावंत व नगरसेवक संजय सावंत, पंचायत समीती सदस्य ॲड. राहुल सावंत यांची पुतणी होती.


