करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊर येथील एका १६ वर्षाच्या मुलीला कशाची तरी पूस लावून पळवून नेले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित मुलगी जादा तासाला (शैक्षणिक तासाला) जाते असे सांगून घरातून गेली होती. सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास संबंधित मुलगी गेली होती. ती मुलगी सायंकाळपर्यत घरी आली नाही. तिची इतरत्र चौकशी केली मात्र ती सापडली नाही.


