सौन्देत वीज कोसळून एक म्हैस ठार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सौन्दे येथे दूध देणाऱ्या एका म्हैसवर वीज कोसळून ठार झाली आहे. बुधवारी (ता. २८) दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान ही वीज कोसळली. रमेश देविदास जाधव यांची ही म्हैस होती. शेतात झाडाखाली त्यांनी म्हैस बांधली होती. दुपारी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु असताना अचानक वीज कोसळली. त्यात म्हैस जागीच ठार झाली. जाधव यांच्याकडे एक म्हैस व तीन रेड्या आहेत. त्यातील एका म्हैसीवर वीज कोसळली. नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *