करमाळा (सोलापूर) : ‘घरातील किरकोळ कामकाजावरून अपमानास्पद वागणुक देऊन शिक्षणासाठी 60 हजार घेऊन ये’ असे म्हणून 21 वर्षाच्या विवाहितेचा छळ केला आहे. याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील भिकार अकोले येथील पतीसह सासू, सासरा व नणंद या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा शहरातील खडकपूरा गल्ली येथील विवाहीतेने ही फिर्याद दिली आहे. त्यावरुन करमाळा पोलिसात हा गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहित फिर्यादीने म्हटले आहे की, तीन महिन्यापासून मी माझ्या माहेरी करमाळा येथील खडकपुरा गल्ली येथे आहे. 2020 मध्ये माझे लग्न भिकार अकोला येथील माणिक शिवाजी भोसले यांच्याशी झाले. विवाहनंतर काही दिवस पती, सासू, सासरे व नणंद यांनी चांगली वागणूक दिली.

मात्र काही दिवसानंतर वागणूकमध्ये बदल झाला. सर्वांनीच मिळून किरकोळ कारणावरून मला बोलण्यास सुरुवात केली. हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. मी गरीब असल्याने व आई-वडिलांचे परिस्थिती गरिबीचे असल्याने मला नोंदवायचे असल्याने मी अन्याय सहन केला. मला त्यांनी उपाशीपोटी ठेवले. वेळोवेळी मारहाण करून खर्चा करता व शिक्षणासाठी 60 हजार घेऊन ये असे म्हणून मारहाण केली.’ फिर्यादीवरुन यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

