करमाळा (सोलापूर) : ‘तुला आईकडे जायचे आहे काय? तिकडे कोण ठेवले आहे का? मग फोन कशाला करायचा आहे?,’ असे म्हणून १९ वर्षाच्या विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. वीट येथे प्रकार घडला आहे.
विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे की, ‘२० तारखेला सकाळी १० वाजताच्या सुमारास घरातील कामे करत होते. दरम्यान घराबाहेर पती, सासरे व दीर हे बसले होते. पतीला माझ्या आईला फोन लावायचा आहे. लय दिवस झाले फोन केला नाही असे म्हणाले. तेव्हा पती मनाला तुला तुझ्या आईकडे जायचे आहे.

तू तिकडे कोणी ठेवले आहे काय? फोन कशाला करायचा आहे?, असे तो म्हणाला तेव्हा त्यांना मी म्हणाले की फोन लावू नका परंतु तुम्ही मला वाईट बोलू नका? तेव्हा राग अनावर झालेल्या पतीने शिवगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथेच पडलेली लाकडी काठी उचलून मारण्यास सुरुवात केली. तेव्हा दीर व सासरा यांनीही लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली.

