करमाळा (सोलापूर) :

करमाळा तालुक्यातील वारकाटणे येथे सुट्टीदिवशी एक मुलगी आई- वडिलांबरोबर शेतात गेली होती. आई- वडिलांबरोबर शेतात काम करत असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी जाते व परत मी माघारी येथे म्हणून ती घरी गेली. त्यानंतर पुन्हा ती शेतात आले नाही. त्यानंतर तिची आई तिला शोधण्यासाठी घरी गेली. तेव्हा संबंधित मुलगी घरी आली नाही.

तिचा आजूबाजूला शोध घेतला मात्र ते मिळून आली नाही. त्यानंतर तिला शोधण्यासाठी सर्वजण घरी गेले. मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर नातेवाईकांकडेही फोन केला मात्र तिचा कुठेही शोध लागला नाही. तिला अनोळखी व्यक्तीने पूस लावून पळून नेले असल्याचा संशय असून याबाबत करमाळा पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचे वय १५ वर्षे आहे.
