करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक येथे दारू पिऊन मोटारसायकल चालवणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. युवराज हनुमंत काळे (वय ३३, रा. पानगाव, ता. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल विलास आलदार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पंजाब वस्ताद चौक येथे केसेस करण्यासाठी हजर असताना काळे हा दारू पिऊन गाडी चालत असल्याचे निदर्शनास आले. त्याची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



