करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वरकुटे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सतीश भागवत हांडे (वय ४९, रा. वरकुटे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडुन ९१० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिस नाईक बालाजी घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बेकायदा दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

वरकुटे येथील सीताराम वस्ताद तालिमच्या मागे एकजण दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेव्हा संशयित आरोपी हांडे हा दारू विक्री करताना सापडला. त्याच्याविरुद्ध कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

