बस स्टॅन्ड परिसरात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

A case has been registered against a person driving under the influence of alcohol in the bus stand area

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील बस स्टॅन्ड परिसरात दारू पिऊन मोटारसायकल चालवणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ बाळू भावाळ (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल विलास आलदार यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. बसस्टँड परिसर येथे केसेस करण्यासाठी हजर असताना भावाळ हा दारू पिऊन गाडी चालत असल्याचे निदर्शनास आले. त्याची उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *