करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील गपाट वस्ती येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विकास मल्हारी वाघमोडे (वय २५, रा. आळजापूर, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग सुरु असताना आळजापूर येथील गपाट वस्ती येथे राहत्या घराच्या मागे एकजण बेकायदा दारू विक्री करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा वाघमोडे हा दारू विक्री करताना दिसून आला. त्याच्याकडून एक हजार २०० रुपयांची दारू जप्त केली आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल सूरज तनपुरे यांनी फिर्याद दिली आहे.



