दिवेगव्हाण येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील दिवेगव्हन येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बबन ज्ञानदेव पाडोळे (वय ५८, रा. दिवेगव्हन) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडुन ८४० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणात चालक पोलिस कॉन्स्टेबल ललित शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बेकायदा दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दिवेगव्हन येथील बसस्थानकाच्या बाजूला वडापावच्या बाजूला एकजण दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेव्हा संशयित आरोपी पाडोळे हा दारू विक्री करताना सापडला. त्याच्याविरुद्ध कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *