करमाळा (सोलापूर) : आई- वडिलांकडे गेलेल्या पत्नीला सासरी आणण्यासाठी मुक्कामी गेलेल्या जावयाला बेदम मारहाण झाली असल्याचा प्रकार तालुक्यातील हिसरे येथे घडला आहे. मारहाण करणारी व्यक्ती ही परांडा तालुक्यातील आहे तर जावई हा करमाळा तालुक्यातील वरकाटणे येथील आहे. पैशाच्या कारणावरून ही मारहाण झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये वारकाटणे येथील माणिक रामदास पवार (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून परांडा तालुक्यातील (जि. उस्मानाबाद) खासगाव येथील बापू आदिनाथ पवार या यासंशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. १४ तारखेला सकाळी हा प्रकार घडला आहे.
पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, हिसरे येथे सासऱ्याच्या गावी मुक्कामी गेलो होतो. पत्नी आई- वडिलांना भेटण्यासाठी गेली होती. १३ तारखेला ती गेली होती. त्यानंतर मी तिला आणण्यासाठी गेलो होतो. त्याच दिवशी गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी पवार हा देखील त्याच्या सासऱ्याच्या घरी आला होता. १४ तारखेला सकाळी सासऱ्याच्या घरातून किराणा दुकानात जात असताना संशयित आरोपी याने पैशाच्या कारणावरून मारहाण केली.


