करमाळा (सोलापूर) :

विवाहित फिर्यादीचे सासर सातोली आहे तर माहेर दहिवली (ता. माढा) आहे. विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझे लग्न सातोली येथील विष्णू भगवान मुरूमकर यांचा मुलगा वैभव विष्णू मुरूमकर यांच्याशी झाला. 2018 मध्ये हा विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर एक महिना त्यांनी मला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर नवरा, सासरा, सासू व नंदावा अनिल बापू भोसले (रा. दहिवली) यांनी छळ सुरु केला.

‘घर बांधण्यासाठी तुझ्या वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली व घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा मला घराबाहेर काढले. तेव्हा आई- वडिलांच्या घरी गेले. आई- वडिलांना सर्व सांगितले. काही दिवसानंतर नवऱ्याच्या घरी आले तेव्हा नवरा, सासू व सासरा यांनी सांगितले की, माझे वडील गरीब आहेत. त्यांच्याकडे एक लाख रुपये नाहीत तेव्हा ते पैसे देऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांनी मला घरात घेतले व काही दिवसानंतर पुन्हा शिवीगाळ करून उपाशी पोटी ठेवून मला शारीरिक व मानसिक त्रास दिला.’ असे फिर्यादीत म्हटले आहे.
