केम येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये भीमराव भगवान दौड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ हजार ५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा बेकायदा दारू विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *