करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र रामचंद्र खटके (वय ३३, रा. केत्तूर नंबर २) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडुन २०३५ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल जोतिराम बारकुंड यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बेकायदा दारू विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

केत्तूर नंबर २ येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे एकजण दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेव्हा संशयित आरोपी खटके हा दारू विक्री करताना सापडला. त्याच्याविरुद्ध कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

