करमाळा तहसील कार्यालयासमोर दारूच्या नशेत गाडी चालवल्याप्रकरणी पाडळीतील तिघांविरुद्ध गुन्हा

A case has been registered against three people from Padali for driving under the influence of alcohol in front of the Karmala Tehsil office

करमाळा (सोलापूर) :

Advertisement
Advertisement
करमाळा तहसील कार्यालयासमोर दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले तिघेही पाडळी येथील असून महारुद्र अर्जुन वायकर (वय ३१), किरण वाल्मीक वायकर (वय ३०) व विकास सुभाष वायकर (वय 30) असे गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिस कॉन्स्टेबल सुरज तनपुरे यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे.

तनपुरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, तहसील कार्यालयाच्या गेट समोर डांबरी रस्त्यावर एका मोटरसायकलवर एकापाठोपाठ एक असे बसून गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी आले. त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल रस्त्यावरून वाकडी- तिकडी चालवीत असल्याने त्यांचा संशय आला. त्यांना हात करून गाडी थांबविली तेव्हा तिघांच्या तोंडाचा दारू पिल्याचा वास येत होता.

त्या तिघांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ते दारूच्या नशेत असल्याचे समोर आले. या तिघांविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 व 128 (I), 194(c) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (ता. 9) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *