करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथील एका शेतकर्याने आत्महत्या केली आहे. मोहन आजिनाथ रोडे (वय 49) असे त्यांचे नाव आहे. रोडे यांनी बुधवारी बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
रोडे सकाळी गावातील दूध डेअरीमध्ये दूध घालून शेतात गेले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. त्याचे कारण समजलेले नाही. गौतम उध्दव रोडे (रा. आळजापूर) या प्रकरणात करमाळा पोलिसांत माहिती दिली आहे. पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.