मध्य रेल्वे मार्गावरील केमजवळ लुपलाईनवर मालगाडीचे इंजिन घसरले

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या सोलापूर- पुणे मार्गावर केम हद्दीत (खानट वस्ती) लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले आहेत. रविवारी (ता. 4) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही दूर्घटना झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले आहे.

सोलापूर ते पुणे मार्गावर रेल्वेचे दोन ट्रक आहेत. यातील सोलापूरकडून पुणेच्या दिशेने जाणार्या ट्रकवरुन मालगाडी जात होती. या गाडीचे रेल्वे इंजिन घसरले आहे. मेन व लुप लाईन असे दोन प्रकार असतात. त्यातील लुप लाईनवर हा प्रकार घडला. ब्रेक फेल झाल्यामुळे हा प्रकार झाला असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *