हॉटेल मालक, भिगवण पोलिसांचे प्रसंगावधान ठरले करमाळाच्या ‘तिच्या’साठी सुरक्षादुत

A girl from Karmala taluka was found in Bhigwan

केत्तूर (अभय माने) : डिप्लोमा परीक्षेत आलेल्या अपयशाने नैराश्याने ग्रासून टाकले आणि यातूनच ‘तिने’ घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र नातेवाईक, एसटी डेपो, हॉटेल मालक आणि भिगवण पोलिसांचे प्रसंगावधान करमाळाच्या (सोलापूर) ‘तिच्या’साठी सुरक्षादुत ठरले आणि ती पुन्हा सुखरूप घरी पोहचली.

करमाळा येथील एक मुलगी डिप्लोमाचे शिक्षण घेत होती. या डिप्लोमाचा नुकताच निकाल लागला. यामध्ये ती अनुत्तीर्ण झाली. तिला नैराशय ग्रासले व यातून तिने कशाचाही विचार न करता घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि करमाळा येथून ती भूम- स्वारगेट एसटीत बसुन प्रवास सुरु केला. याची कुणकुण नातेवाईकांना कळताच त्यांनी मुलीचा शोध सुरू केला.

दरम्यान ती एसटीत गेल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी एसटी डेपो, पोलिस प्रशासनाला सांगितले. सदर मुलीचा फोटो, नाव, पत्ता व्हाट्सएपवर व्हायरल करण्यात आला. साहजिकच सर्वजण सतर्क झाले होते. यातूनही इंदापुर डेपो मार्फतही सर्व एसटी चालक, वाहक व एसटी थांब्यावरील हॉटेल मालकांना सतर्क करण्यात आले होते.

अखेर ही योजना कामी आली आणि डाळज (ता. इंदापूर) हद्दीत असणारे हॉटेल उदयचे मालक समीर मुलाणी यांना एका एसटीत ही मुलगी दिसताच आधीच सावध असणारे भिगवण पोलिसांना याची माहिती दिली व सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने या मुलीला ताब्यात घेतले. यानंतर दिलीप पवार व महिला पोलिस दीपाली खेत्रे यांनी तिचे सुमुपदेशन केले. त्यानंतर नातेवाईक भिगवणला पोहचताच संबंधित मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. अर्थात ही घटना आठ दिवसांपूर्वीची असली तरी भिगवण पोलिसांनी प्रसिद्धपासुन दूरच ठेवली होती. मात्र एका बैठकीतून ही बातमी चर्चेला आली. याबाबतचे वृत्त पुणे ‘पुढारी’ने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *