करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथून २३ वर्षाची एक महिला बेपत्ता झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित बेपत्ता झालेल्या महिलेचा गेल्या काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. तिच्या पतीचे नुकतेच सरकारी विभागात सिलेक्शन झाले होते. दरम्यान संबंधित विवाहित बेपत्ता झाली. याची नोंद करमाळा पोलिसात नुकतीच झाली आहे. पोलिसांनी याचा योग्य तपास करून संबंधित मुलीचा तपासही लावला आहे.
नातवाची आजोबाला दगडाने मारहाण जावईला चावा; आळजापूर येथील एकाविरुद्ध गुन्हा
करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथील एका मुलाचा तालुक्यातील एका गावातील २३ वर्षाच्या मुलीशी विवाह झाला. साधारण एक महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता, असे सांगितले जात आहे. संबंधित मुलगा नुकताच सरकारीला लागला होता. विवाह झाल्यानंतर अवघे काही दिवस ते एकत्र राहिले. त्यानंतर मुलगी पहाटेच बेपत्ता झाली.
पांडे गटात काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात यावी : ऍड. गपाट
करमाळा पोलिसात याची नोंद हरवले असल्याची म्हणून झाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास करून योग्य दिशेने तपास करण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. संबंधित बेपत्ता विवाहित कोठे? कशी गेली? याचा तपास लावण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.