करमाळा (सोलापूर) : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २०) विशवस्त व संबंधित विभागाच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी भाविकांच्या दृष्टीने महत्वाच्या सुविधा पुरवण्याबाबत तहसीलदार माने यांनी सूचना दिल्या आहेत. पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्यासह महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, नगरपालिका, आरोग्य विभाग व श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायतचे सरपंच व येथील पदाधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पाणी, स्वच्छता, रस्ता व विजेची समस्या निर्माण होणार नाही. त्यासाठी संबंधित विभागाच्या प्रमुखांनी नियोजन करावे. आरोग्यबाबतही दक्ष राहण्याच्या सूचना तहसीलदार माने यांना दिल्या आहेत. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विश्वस्त डॉ. महेंद्र नगरे, डॉ. प्रदीपकुमार जाधव, अनिल पाटील, महादेव भोसले, सदानंद सोरटे, देवानंद सोरटे, सुशील राठोड, बाळासाहेब सोरटे, बापू पुजारी, दादासाहबे पुजारी, सुभाष सोरटे, मधुकर सोरटे, विजय पुजारी, ओंकार पुजारी, जयदीप पुजारी, विजय सोरटे, संदीप पुजारी, अभिमान सोरटे, नारायण सोरटे, योगेश सोरटे, बिभीषण सोरटे आदी उपस्थित होते.

कोरोनंतर यावर्षी करमाळ्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिर येथे मोठ्या उत्सहात नवरात्रोत्सव होत आहे. याची तयारी प्रशासनाकडूनही सुरु आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यातूनच तहसीलदार माने यांनी बैठक घेऊन आढावा घेतला व नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत म्हणून सूचना दिल्या आहेत.

