करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विद्यानगर येथे घरासमोर उभा केलेली एकाची मोटारसायकल चोरीला गेली आहे. यामध्ये दीपक वसंत देवकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या व्यक्तीगत कामासाठी मोटारसायकल घेतली होती. नेहमीप्रमाणे ती मोटारसायकल १४ तारखेला रात्री घरासमोर उभा केली होती. १५ तारखेला सकाळी पहिले तर मोटारसायकल दिसली नाही. तिचा इतरत्र शोध घेतला मात्र सापडली नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरुन अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही मोटारसायकल १२ हजार रुपयांची होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.



