पांडे (अमजद मुजावर) : करमाळा (सोलापूर) तालुक्यातील पांडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शुक्रवारी (ता. २३) सकाळी शाळा भरतेवेळी वर्गात मुले जात असताना दुसरीच्या वर्गात साप दिसला. साप दिसताच विद्यार्थी घाबरले. त्यानंतर त्यांनी त्यांनी मुख्याध्यापक लहू गबाले यांना त्याची माहिती सांगण्यात आली. त्यांनी तत्काळ सर्पमित्र ज्ञानदेव क्षीरसागर यांना संपर्क साधला. त्यांनी गांभीर्य ओळखून साप पकडला व निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला. मात्र यामुळे येथील शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे येथील शाळेच्या बाजूने गवत वाढलेले आहे. याबरोबर चिलारीची झाडे आहेत. येथेच राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे येथील स्वछता करावी. शाळेचे हीत पाहून नागरिकांनी स्वतः स्वछता करावी, अशी मागणी केली जात आहे.

