करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या दत्ता पाटील (रा. हडसणी, ता. हदगांव, जि. नांदेड) यांना पाठींबा देण्यासाठी बुधवारी (ता. १७) दुपारी १२ वाजता निवेदन दिले जाणार आहे. त्यासाठी मराठा समाज बांधवानी तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

मराठा आरक्षण मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव दत्ता पाटील हे मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा आरक्षण हे ओबीसीमधून 50 टक्केच्या आतूनच मिळावे. या प्रमुख मागणीसाठी उपोषणास बसले आहेत. त्या उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने बुधवारी तहसील कार्यालय करमाळा येथे निवेदन देण्यात येणार आहे, तरी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित रहावे.

