वादग्रस्त वक्तव्य करणार्या बकाले यांच्यावर कारवाई करा; अन्यथा मुख्यमंत्र्यांना फिरु देणार नाही, मराठा समाज बांधवाचा करमाळ्यात इशारा

करमाळा (सोलापूर) : बकाले नावाच्या पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या वक्तव्याचा करमाळ्यात निषेध करण्याता आला आहे. याबाबत सकल मराठा समाज करमाळा व मराठा क्रांती मोर्चा करमाळा यांच्या वतीने शुक्रवारी (ता. 16) तहसीलदार समीर माने व पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांना निवेदन देत वक्तव्य करणार्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्याच्यावर कारवाई झाली नाही तर मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना महाराष्ट्रात मराठा समाज व बहुजन समाज फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये मराठा व सर्व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *