करमाळा (सोलापूर) : उजनी जलाशयात तालुक्यातील चिखलठाण हद्दीत 28 ते 30 वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. सदरची व्यक्ती पाण्यात वाहत आली असल्याचा संशय करमाळा पोलिसांना आहे. संबंधित व्यक्तीची ओळख पटलेली नाही. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी करमाळा पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी केले आहे. उजनी जलाशयाच्या पात्रामध्ये 24 सप्टेंबरला दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा मृतदेह सापडला. त्याला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. पाण्यात बुडून संबंधित तरुणाचा मृत्यू झाला असल्याचा संशय आहे. त्याच्या अंगावर पिवळा शर्ट आहे.


