करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभुर्णी राज्य महामार्गावर कंदर येथील शिंदे वस्ती जवळ एसटी बस व कंटेनर यांच्यात धडक झाली. या अपघातामध्ये एसटी बस चालक जखमी झाला असून बसचे साधारण १५ हजाराचे नुकसान झाले आहे. याप्रकरणात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २६ तारखेला दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला असून एसटी बस चालक रामा सगा मडके (वय 50, रा. कोळवाला, ता. संगमनेर, जि. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

26 तारखेला सकाळी संगमनेर येथून ते पंढरपूरला बस घेऊन जात होते. तेव्हा कंदर येथील शिंदे वस्तीजवळ आल्यानंतर हा अपघात झाला. अपघातमध्ये एसटीची समोरची काच फुटून नुकसान झाले आहे. याबरोबर फिर्यादी चालक मडके यांच्या डोक्याला जखम झाली आहे. निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालवून एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

