करमाळा (सोलापूर) : ‘माझा कार्यकर्ता विकाऊ नसून स्वाभिमानी आहे. कार्यकर्त्यांच्या बळावरच आमदारपदापर्यंत पोहचू शकलो,’ अशी स्पष्टोक्ती माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली. दरम्यान ‘आदिनाथ सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असून ही लढाई आम्ही जिंकु,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाटील गटाच्या वतीने आज (मंगळवारी) माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस जेऊरसह करमाळा तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला.

करमाळा तालूका माळी संघ, सकल जैन संघ, मराठा सेवा संघ, यंग मुस्लीम जमात, नाभीक संघटना, सराफ असोशिएशन, व्यापारी संघटना, कर्मयोगी पतसंस्था, लोकनेते पतसंस्था, आनंद पतसंस्था तसेच विविध ग्रामपंचायती व सोसायटींच्या वतीने झालेल्या नागरी सत्कारास उत्तर देताना माजी आमदार पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. सुभाष सुराणा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप तळेकर, आदिनाथचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, नवनथ झोळ, धूळाभाऊ कोकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,

पंचायत समितीचे माजी सभापती अतूल पाटील, बिभीषण आवटे, गणेश चौधरी, दत्ता सरडे, शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, पोपटशेठ मंडलेचा, रामलाल कोठारी, उदयसिंह मोरे- पाटील, शिवसेना (मुख्यमंत्री शिंदे गट) उपजिल्हा प्रमुख महेशदादा चिवटे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, भास्कर कांडेकर, सचिव प्रा. अर्जून सरक, प्रा. डाॅ. अनंतराव शिंगाडे, प्राचार्य दहिभाते, मुख्याध्यापक व्यवहारे, प्रा. डाॅ. संजय चौधरी यांच्यासह जेऊर ग्रामपंचायतीचे आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.
म्हणून आबांना पुन्हा आमदार करणे हीच खरी सदिच्छा असणार!

जेऊर सकल जैन संघाच्या वतीने अहमदनगर येथील आनंद ऋषीजी नेत्यालयच्या माध्यमातून जेऊर येथे नेत्रशिबीर घेतले.याबरोबर भव्य आरोग्य शिबीरही राबविण्यात आले. यामध्ये विविध आजारावरील तज्ञ डाॅक्टरांनी मोफत रुग्णसेवा केली.

माजी आमदार पाटील म्हणाले, ‘माझे कार्यकर्ते हेच माझे बळ असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका आम्ही कार्यकर्त्यांच्या बळावरच जिंकणार. आजपर्यंत जनमत नेहमीच माझ्या बाजूला राहिल्यानेच मी अनेकदा विविध निवडणुकीत धनशक्तींचा पराभव करु शकलो. आदिनाथ सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून आम्ही प्रयत्न करत असून ही लढाई आम्ही जिंकु असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमास करमाळा मतदार संघातील विविध गावचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी तर आभार माजी सरपंच सुलेमान मुल्ला यांनी मानले.
