करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोफळज येथे एका शिक्षकाच्या शेतातून कृषिपंपाची केबल चोरीला गेली आहे. याप्रकरणात अनोळखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गौतम काशिनाथ कांबळे यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून रविवारी (ता. 7) हा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी कांबळे हे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते पोफळज येथील आहेत. तेथे त्यांची शेती आहे. सध्या ते पुणे जिल्ह्यातील दौण्ड येथे राहतात. सुट्टीच्या दिवशी ते शेतात येतात. शेतात येऊन फेरफटका मारतात. २४ जुलैला ते शेतात आले होते तेव्हा त्यांना शेतातील विहिरीत कृषीपंपाला जोडण्यात आलेली ३५ ते ४० फूट केबल चोरीला गेली. ही केबल १३ रुपयांची होती.



