‘लंपी’ने सावडीतही गाईंचा मृत्यू; पशुपालकांनी घाबरून न जाता लसीकरण करून घेण्याचे आवाहन

Farmers should be vigilant to control Lumpi Tehsildar Sameer Mane

सोलापूर : जिल्ह्यात लंपी आजाराने चार गाईचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. सांगोला तालुक्यातील वाढेगाव, मिसाळवाडी आणि धायटी येथील प्रत्येकी एक तर तालुक्यातील कचरेवाडी येतील एका गाईचा मृत्यू झाला. जिल्ह्यात लंपी आजाराने आतापर्यंत 17 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 10 गाई आणि सात बैलांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement

मृत झालेले जनावरे तालुकानिहाय : माळशिरस : 3 बैल व 1 गाय असे एकूण 4, गावाची नावे- प्रत्येकी 1 बैल तिरवंडी व 2 बैल, शिंदेवाडी आणि 1 गाय कचरेवाडी. सांगोला : 5 गाय, गावाची नावे – प्रत्येकी 1 याप्रमाणे शिवणे, महुद, धायटी, मिसाळवाडी, वाढेगाव. पंढरपूर : 1 गाय, गावाचे नाव- कान्हापुरी. माढा : 1 बैल, गावाचे नाव- चौबे पिंपरी. करमाळा : 2 गाय, गावाची नावे- सावडी व राजुरी. उत्तर सोलापूर : 1 गाय, 3 बैल एकूण 4 जनावरे, गावाची नावे- 1 बैल कवठे, 1 बैल बेलाटी, 1बैल, देगांव आणि 1 गाय (बसवेश्वरनगर) देगांव.

पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांना लक्षणे दिसल्यास पशु वैद्यकीय दवाखान्यात त्वरित दाखवून घ्यावे. तसेच जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *