करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात ‘कमलाई नगरी’ हे आणखी एक साप्ताहिक आले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर आज (बुधवारी) त्याच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले आहे. जयंत दळवी हे या साप्ताहिकाचे संपादक आहेत. ‘पुण्यनगरी’सह इतर दैनिकात पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी करमाळ्यात ‘जेआरडी’ माझा’ हे न्यूज पोर्टल सुरु केले. त्यानंतर आता त्यांनी आता साप्ताहिक सुरु केले आहे. या साप्ताहिकाच्या प्रकाशनावेळी तालुक्यातील विविधक्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

‘हाती मशाल जागृतीची’ असे ब्रीद वाक्य घेऊन ‘कमलाई नगरी’ साप्ताहिक करमाळ्यात आले आहे. टॅबलेट स्वरूपातील पहिलाच अंक १६ पानी आहे. ८ पाने कलर व ८ पाने ब्लॅक अँड व्हाईट असा हा अंक असून पहिल्या पानावर ‘करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत व जागृत देवस्थान श्री कमलादेवी’ या मथळ्याखाली कमलादेवीची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या पानावरही देवीचीची माहिती देण्यात आली आहे.

आगामी वाटचालीत सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक, व्यापार, उद्योग, प्रशासकीय आदी विषयांवरील वार्तांकन व प्रश्न मांडण्यासाठी हे हे सर्वांचे मुक्त व्यासपीठ राहील, असे या अंकाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
