तुमच्या शेतातील साहित्य सुरक्षित आहे का? ट्रॉली पाठोपाठ म्हैस चोरीला

Are your farm materials safe The buffalo was stolen after the trolley

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथून उभा केलेल्या दोन ट्रॉली नुकत्याच चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर वीट येथून एका शेतकऱ्याची म्हैसही चोरीला गेली. अशा घटना पहिल्यांदाच घडल्या आहेत असे नाही तर यापूर्वीही बैल चोरी, ट्रॅक्टर चोरी असे प्रकार घडलेले आहेत. मात्र या चोरीमुळे पुन्हा एखादा हा मुद्दा चर्चेत आला आहे. असे प्रकार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ट्रेलर चोरांचा तपास करत शोध लावला. ही गोष्ट चांगली आहे मात्र अशा चोरीच्या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात अनेक शेतकऱ्यांचे साहित्य पडलेले असते. ते साहित्य चोरट्यांना माहित कसे होते? हा प्रश्न शेतकरी करत असून यावरून आपल्याच शेतात ठेवलेले साहित्य सुरक्षित नसून याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वाशिंबे येथील शेतकरी अमोल भोग यांनी त्यांच्या शेतात ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉली उभा केल्या होत्या. 2 सप्टेंबरला रात्री या ट्रॉली चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर वीट येथील एका शेतकऱ्याची म्हैस चोरीला गेली होती. त्यावरून शेतकऱ्यांचे शेतातील साहित्य सुरक्षित नाही हे स्पष्टपणे दिसत आहे. शेतकऱ्यांचे विद्युतपंप, पाईप, जनावरे व इतर साहित्य पडलेले असते. आपल्या शेतातून कोणीही साहित्य नेहणार नाही असा विश्वास त्यांना असतो. मात्र आता हाच विश्वास शेतकऱ्यांचा कमी होत चालला आहे.

शेतकऱ्यांची शेतातील अवजारे, जनावरे चोरी जातील की काय? याच्या भयाखाली ते राहू लागले आहेत. ट्रेलर चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी 70 किलोमीटरचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून व मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून व इतर गोपनीय सूत्रे कार्यान्वित करून फलटण येथील गुणवरे गावापर्यंत पोलिस पोहोचले आणि तपास लावला. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलिस अधीक्षक हिमत जाधव, करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून चोरट्याचा शोध लावला. मात्र साहित्य चोरीच होणार नाही यासाठी आता शेतकऱ्यांनीही दक्ष राहण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांचे साहित्य चोरीला जाणे हे करमाळा तालुक्यात पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्याचा तपास पोलिस वेळोवेळी करतात. मात्र अशा घटनाच घडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क राहणे अवश्यक आहे. शेतात साहित्य ठेवतानाही योग्य ती काळजी घेईला हवी आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी शेतात साहित्य ठेवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. जनावरे बांधताना चोर त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही अशी ठिकाणी बांधायला हवीत. रस्त्याच्या कडेला असलेली वस्ती यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शक्य तो आपल्यापासून जनावरे व साहित्य ठेवणे टाळावे. आपले लक्ष राहील अशा ठिकाणी वस्तू व जनावरे ठेवावीत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *