मंत्रीपदी सावंत यांची वर्णी लागताच करमाळ्यात पेढे भरवून आंनदोत्सव; पालकमंत्रीपदाची केली मागणी

-

करमाळा (सोलापूर) : आमदार प्रा. तानाजी सावंत यांची मंत्रीपदी वर्णी लागताच करमाळा तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी पेढे भरवून आनंद व्यक्त केला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे द्यावी, अशी मागणी शिंदे समर्थक शिवसैनिकांनी केली.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहरप्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, मारुती भोसले, नागेश शेंडगे, युवा सेनेचे मावलकर, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, संजय जगताप, राजेंद्र मिरगळ उपस्थित होते.
सोलापूरचे पालकमंत्रीपद प्रा. तानाजी सावंत यांच्याकडेच राहणार!
– सोलापूरचे पालकमंत्रीपद भाजपकडेच जाणार!

चिवटे म्हणाले, अडीच वर्ष राष्ट्रवादीने सत्तेचा वापर स्वतः च्या कुटुंबासाठी व स्वार्थासाठी केला होता. आता खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री शिंदे, भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प मार्गी लागतील. रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. प्रा. सावंत यांचा मंत्री म्हणून समावेश झाल्यामुळे एक सक्षम व धडाकेबाज निर्णय घेणारा मंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळणार असून करमाळा तालुक्यातील दहीगाव सिंचन योजना, कुकडीचे उर्वरित कामे, रस्त्याची कामे मार्गी लागतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जातेगाव- टेंभुर्णी महामार्गासाठी आता भाजपच आक्रमक; स्वातंत्र्यदिनी टाळे ठोको आंदोलन करण्याचा PWD ला इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *