पांडेतील शिक्षकाची तक्रार करताच खासदार निंबाळकर यांनी दिला सबंधीताला तत्काळ निलंबीत करण्याची सूचना

करमाळा (सोलापूर) : पांडे येथील शिक्षकांबद्दल तक्रार करताच त्याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तत्काळ निलंबीत करण्याची सूचना केली आहे. यावेळी उपस्थितांनी अनेक तक्रारी मांडल्या. प्रादेशीक नळ पाणी पुरवठाबाबतही अनेक तक्रारी आल्या. त्यावरुन अधिकार्यांचीही त्यांनी कान उघडणी केली.

पांडे जिल्हा परीषद शाळा येथे ओहोळ व घाडगे हे शिक्षक तक्रार करुनही दूर्लक्ष करत होते. त्याची तक्रार बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अनिल तेली यांनी खासदार निंबाळकर यांच्याकडे केली होती.

भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे करमाळा दोर्यावर आहेत. त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. तेव्हा तहसीलदार समीर माने व पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजावटे यांनी त्यांचे स्वागत केले.

गटविकास अधिकारी मनोज राऊत, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, विठ्ठलराव भणगे, डॉ. अमोल घाडगे, किरन बोकन, हरीदास डांगे, डॉ. वसंतराव पुंडे, दत्तात्रय जाधव, शंभुराजे जगताप उपस्थित होते.

तहसीलदार माने यांनी प्रथम प्रधानमंत्री किसान योजना, रेशन कार्ड (स्वस्त धान्य) योजनेची माहिती दिली. यावेळी 90 लाभार्थ्यांनी हक्क सोडला असून याचा सर्व्हे केला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले. सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती देऊन तालुकास्तरावर त्याची कशी अमलबजावणी केली जात आहे हे सांगितले. आपल्याकडे अजूनही पाऊस कमी झालेला आहे. मात्र ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे तेथील भरपाईसाठी प्रस्ताव दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीचे संतोष वारे, बळीराजे शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब सुपनवर, अंगद देवकाते, पत्रकार अशोक मुरुमकर आदींनी प्रश्न मांडले.

-टेंभुर्णी ते जातेगाव महामार्गासह करमाळा तालुक्यातील रस्ता

  • रेल्वे संदर्भातील प्रश्न
  • घारगाव येथील होगले यांनी करमाळा पोलिसात खोटी तक्रार केली म्हणून
  • राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनीही रस्त्याचा विषय मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *