सोलापूर : आयुक्त (कृषी) यांच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता असलेल्या योजनांचा लाभ 29 ऑगस्टपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.
ठिबक सिंचन, तुषार, यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, हरितगृह, शेडनेट, कांदाचाळ, पॅक हाऊस, बेदाणा शेड, कोल्ड स्टोरेज, मधुमक्षिका पालन, फळबाग लागवड, (पेरु, आंबा, केळी, पपई, चिंकु, इ.), सामुहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, इलेक्ट्रिक मोटर, सोलर पंप, नवीन विहिर, विहिर दुरुस्ती, वीज कनेक्शन, रायपनिंग चेंबर, ड्रॅगन फ्रुट, इ. बाबीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अनुसूचित जाती व जमाती लाभार्थ्यांनी 29 ऑगस्ट 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.


