करमाळा (सोलापूर) : बाळेवाडी येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त बालदिंडी काढण्यात आली. यामध्ये अंगणवाडीचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत गावातून पालखीची मिरवणूक काढली. यावेळी शैक्षणिक जनजागृती करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/07/IMG-20240708-WA0018-1024x1024.jpg)
या सोहळ्यात पालकांनी विद्यार्थ्यांमधील विठ्ठल रुक्मिणीचे ठिकठिकाणी स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. देशमुख, श्री गायकवाड, कुरबु मॅडम, नगरी मॅडम तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही ज्ञानोबा तुकारामचा गजर केला. मंदिरापुढे रिंगण खेळून दिंडीचे सांगता करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश नलवडे, उपाध्यक्ष गणेश नलवडे यांच्यासह विष्णू नलवडे, भाऊसाहेब नलवडे, राजेश नलवडे, माजी अध्यक्ष संतोष नलवडे, बापूराव नलवडे, बंटी मिसाळ, नितीन नलवडे आदी उपस्थित होते.