करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक बिनविरोध झाल्यात जमा आहे. याची फक्त घोषणा होणे बाकी आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 13 जागांसाठी 13 अर्ज आले आहेत. करमाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सी. एस. मुंडे या निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीसाठी वंदन नलवडे, गुरुदास नलवडे, अभिजीत नलवडे, बापू नलवडे, गणेश नलवडे, नवनाथ नलवडे, अंगद मिसाळ, पद्मिणी नलवडे, पुष्पा मिसाळ, सुभाष मोहळकर, उत्तमराव भोगे, भागवत साळवे व पांडुरंग नलवडे यांचे अर्ज आले आहेत.
नेर्लेत १३ जागांसाठी ४३ अर्ज
नेर्ले विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक अतिशय चुरशीने होण्याची चिन्हे आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 13 जागांसाठी 43 अर्ज आले आहेत. करमाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. के. मुंडे या निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

वरकुटेत १३ जागांसाठी १२ अर्ज
वरकुटे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक बिनविरोध झाल्यात जमा आहे. याची फक्त घोषणा होणे बाकी आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 13 जागांसाठी 12 अर्ज आले आहेत. येथे एका जागेवर आर्ज न आल्याने रिक्त राहणार आहे. करमाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून उमेश बेंढारी हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीसाठी तानाजी बेडकुते, सोमनाथ जगदाळे, सुरेश जाधव, रामचंद्र जगताप, बालाजी मोघल, रावसाहेब जगदाळे, प्रशांत जगताप, भागिरथी जगताप, सविता बेडकुते, सोजर जगताप, नामदेव शिंदे व सुरेश मस्के यांचे अर्ज आले आहेत.

पुनवरमध्ये १३ जागांसाठी १५ अर्ज
पुनवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक बिनविरोध झाल्यात जमा आहे. याची फक्त घोषणा होणे बाकी आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी 13 जागांसाठी १५ अर्ज आले आहेत. करमाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. या निवडणुकीसाठी प्रशांत नरसाळे, संभाजी वेताळ, सुलतान पठाण, जहागिर सय्यद, सतिश नरसाळे, श्रीरंग शेळके, भाऊराव गाडवे, विलास जाधव, बाबासाहेब कोल्हे, बिभिषण भांडवलकर, मनिषा ननवरे, सुशिलाबाई धुमाळ, अतुल थोरवे, बायडाबाई गोरड व अशोक नरसाळे यांचे अर्ज आले आहेत.
अर्जुननगरमध्ये १३ जागांसाठी १३ अर्ज
अर्जुननगर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक बिनविरोध झाल्यात जमा आहे. याची फक्त घोषणा होणे बाकी आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 13 जागांसाठी 13 अर्ज आले आहेत. करमाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. या निवडणुकीसाठी राजेंद्र अडसुळ, नटराज भोगे, प्रमिला भोगे, सोनाली भोगे, रमण भोगे, रामदास रोकडे, गोरख घाडगे, सुभाष ननवरे, अतुल आतकरे, गुरुदास आडगळे, राजेंद्र थोरात, प्रकाश झोळ व संजय माने यांचे अर्ज आले आहेत.
कामोणेत १३ जागांसाठी १३ अर्ज
कामोणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणुक बिनविरोध झाल्यात जमा आहे. याची फक्त घोषणा होणे बाकी आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 13 जागांसाठी 13 अर्ज आले आहेत. करमाळा सहकारी संस्था सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणुक प्रक्रीया सुरु आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. के. मुंडे या निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. या निवडणुकीसाठी भाऊसाहेब नलवडे, नानासाहेब नलवडे, सुरेश नलवडे, पंकज नलवडे, सुधीर जाधव, अरुण काळे, बापू पवार, लालासाहेब नलवडे, मखमल शिंदे, हेमलता करळे, बापू भांडवलकर, नामदेव देवमुंडे व रामकृष्ण खराडे यांचे अर्ज आले आहेत.