करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पांडे ते अर्जुननगर (जुना रस्ता) या पालखी रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अनिल तेली यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई मंत्रालयात जाऊन त्यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर उपस्थित होते. हा रस्ता व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने ठराव केला आहे.

पांडे ते अर्जुननगर या रस्त्यासह कुकडी लाभ क्षेत्रात मांगी तलावाचा समावेश व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम सुरु करावे, तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्याची दुरुस्ती करावी, मांगी एमआयडीसीचे काम मार्गी लावावे, रिटेवाडी उपसासिंचन योजनेला मंजुरी मिळावी, सीना नदीवर सांगोबा येथे मोठा पूल करावा अशा विविध मागण्याचे त्यांनी निवेदन दिले आहे.

