करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी बारामती ऍग्रोने आता न्यायालयात धाव घेतली आहे. बारामती ऍग्रोबरोबर करार झालेला असताना पुन्हा संचालक मंडळाला कर्ज पुनर्घटनसाठी (ओटीएस) परवानगी कशी? असा प्रश्न करत याचिका करण्यात आली आहे. यावर पुणे येथील डीआरटी न्यायालयात शुक्रवारी (ता. २६) सुनावणी होणार आहे.

बारामती ऍग्रोने केलेल्या याचिवेकवर आज (गुरुवारी) सुनावणी झाली. तेव्हा पुढील तारीख देण्यात आली आहे. आदिनाथ कारखान्यासाठी संचालक मंडळ व बारामती ऍग्रो न्यायालयात गेले आहे. त्यामुळे कारखान्याची मालकी आता न्यायालय ठरवणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ऊस गाळपाचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आदिनाथ कारखाना सुरु होणे आवश्यक आहे, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र न्यायालयीन लढाईत यावर्षी कारखाना सुरु होणार का? यावरच आता प्रश्न चिन्ह निर्माण आहे.

बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे हित पाहून आम्ही कारखाना सुरु करण्यासाठी प्राधान्य देत आहोत. ज्याप्रमाणे बारामती ऍग्रोने ऊसाला दर दिला आहे तसाच दर आम्ही आदिनाथलाही देणार आहोत. मात्र त्यात सध्या राजकारण सुरु आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (एमएससी) आदिनाथवर कारवाई केली. तेव्हा बारामती ऍग्रोकडे कारखाना आला. त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या.’

गुळवे म्हणाले, एमएससी बँकेने ओटीएस केले आहे ते चुकीचे आहे. बारामती ऍग्रोकडून १ वर्षाचे पैसे भरून घेतलेले आहेत. आणि दुसरीकडे पुन्हा कारखान्याशीही व्यवहावर सुरु ठेवला आहे. हे चुकीचे आहे. त्याच्याविरुद्ध आम्ही आता न्यायालयात गेलो आहोत. आमच्याबरोबर भाडेकरार झालेला असताना, आम्ही एक वर्षाचे भाडे ३ कोटी रुपये भरलेले आहेत. तरी कारखान्याला ओटीएससाठी पत्र दिले जाते आणि याबाबत बारामती ऍग्रोला माहिती दिली जात नाही, आमचाही त्यावर दावा आहे,’ त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.
‘आदिनाथ’साठी साडेपाच कोटी भरले! सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष
तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी बुधवारी एमएससी बँकेत पैसे भरण्यात आले आहेत. आदिनाथसाठी सध्या न्यायालयात प्रकरण सुरु आहे. सोमवारी (ता. २२) मुंबईतील ‘डीआरएटी’ न्यायालयात सुणावणी होणार आहे. त्यापूर्वीच एमएससी बँकेत संचालक मंडळाने ओटीएससाठी पैसे भरले असल्याचे समजत आहे. नेमके पैसे किती भरले आहेत हे अधिकृत समजलेले नाही.
विश्वसनीय व अचूक बातम्या मिळवण्यासाठी येथे ‘क्लिक’
आदिनाथसाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक कोटी भरले होते. त्यानंतर आता संचालक मंडळाच्या विनंतीवरुन जयवंत मल्टीस्टेटने पैसे भरले आहेत, अशी माहिती विश्वासनीय सूत्राकडून समजली. आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोला आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रीया पूर्ण झाली नाही. त्यानंतर याबाबत न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पुणे येथील ‘डीआरटी’ न्यायालयाने कारखान्याचा ताबा ‘एमएससी’ला देण्याबाबत आदेश दिला होता.
विश्वसनीय व अचूक बातम्या वाचण्यासाठी येथे ‘क्लिक’
त्यानंतर या आदेशाला मुंबईत आव्हान देण्यात आले. त्यानंतर उच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले होते. दरम्यान संचालक मंडळाला दिलासा मिळाला होता. पुढील तारीख 22 अॉगस्ट देण्यात आली. तर दुसरीकडे बारामती ऍग्रोही आता न्यायालयात गेले आहे. यात नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.