करमाळा (सोलापूर) : तालुक्यात सध्या ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सहकारी संस्थांचे सहायक निबंधक दिलीप तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका होत आहेत. यामध्ये काही पतसंस्था आणि शिक्षक संस्थांचाही समावेश आहे. साधारण मार्च अखेर या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.

तालुक्यात सर्व प्रकारच्या ३१४ सहकारी संस्था आहेत. या संस्थांच्या निवडणूक टप्याटप्यात होत आहेत. येणारी बाजार समिती निवडणूक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या निवडणूक महत्वाच्या आहेत. त्यामुळे या निवडणूका घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. नियमानुसार पारदर्शकपणे या निवडणूक व्हाव्यात म्हणून प्रक्रिया राबवली जात असल्याचे तिजोरे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

निवडणूक होत होत असलेल्या संस्थांमध्ये बहुतांश संस्था या विविध कार्यकरी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. यात जिंती येथे निवडणूक लागली असून ५ तारखेला येथे मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. अनेक संस्था या स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन बिनविरोध होत असल्याचे चित्र आहे.
