करमाळा (सोलापूर) : पोलिसात दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी महिलेचे ओळख उघड होत आहे. त्यातून बदनामी होत आहे. मात्र तिची ओळख जाहिर होणार नाही याची काळजी घ्या, अशी मागणी महिला दक्षता समितीच्या सदस्या व दलित सेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा निलावती कांबळे यांनी केली आहे.

मिसींग दाखल व पुस लाऊन पळवून नेलेल्या घटनेत अल्पवयीन मुलींची नावे जाहिर केली जात असल्याचे काही ठिकाणी जाणवले आहे. विवाहीत महिला छळ व मिसींगमध्ये महिलांची ओळख जाहीर होत असल्याने संबंधितांची बदनामी होत आहे. हे प्रकार त्वरीत थांबले नाही तर आम्ही रितसर तक्रार दाखल करणार आहोत, असेही कांबळे यांनी म्हटले आहे.

लहान गावाचे नाव समोर आले तरीही महिलेची व मुलीची ओळख जाहीर होत आहे. असे प्रकार शक्यतो टाळावेत. पोलिसांनीही यामध्ये लक्ष घालावे व असे प्रकार कोठे घडल्यास आमच्याशी (7709932726) संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
