करमाळा (सोलापूर) : ‘तुला मुलगा होत नाही, तू इथे राहू नको, तू चोरी करते’, असे म्हणत २८ वर्षाच्या विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास दिल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील पतीसह तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये विवाहितेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींनी केलेल्या मारहाणीत विवाहितेच्या करंगळीला जखम झाली आहे.
फिर्यादीने म्हटले आहे की, 2011 मध्ये माझे लग्न झाले. पती, सासरे व नणंद यांनी मला माहेरून प्लॉट घेण्यासाठी पैसे घेऊन ये, तुला मुलगा होत नाही, तु इथे राहू नको, तू चोरी करते, असे म्हणून शारीरिक व मानसिक त्रास देऊन जातहट केला. उपाशीपोटी ठेवून मला मारहाण केली. गेल्या महिन्यात वडील भेटण्यासाठी उंदरगाव येथे आले. तेव्हा वडील भेटून गावी गेले. ते गावी पोचले का नाही हे विचारण्यासाठी त्यांना फोन केला.

दरम्यान पतीने तुझा बाप येथे का आला होता? असे म्हणून घरातील लाकडी काठीने मारहाण केली. त्यात डाव्या हाताचीला जखम झाली आहे. माझ्या सर्वांगावर मारहाण केली. याबाबत वडिलांना माहिती सांगितली होती. त्यानंतर मला पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

