करमाळा (सोलापूर) : देशाच्या अमृतमोहत्सवी वर्षानिमित्त करमाळ्यात भाजपच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. करमाळा शहरातील मुख्य मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्वातपुढे डीजे होता. त्यावर देशभक्तीपर गीते वाजवण्यात येत होती. त्यानंतर भाजपचे पदाधिकारी व त्यांच्यामागे मोटारसायकली होती.
या सर्व गाडयांना तिरंगा झेंडा लावण्यात आला होता. या रॅलीच्या माध्यमातून शहरातील भाजी मंडई परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या रॅलीमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सरचिटणीस अमरजित साळुंखे, किरण बोकन, रामा ढाणे आदी सहभागी झाले आहेत. (रॅली अजून सुरु असल्याने बातमीत बदल होऊ शकतो.)