हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या एक नवा ट्रेंड पसरला आहे. गरोदर अभिनेत्री आपल्या घरी कोणीतरी नवा पाहुणा किंवा पाहुणे येणार असल्याची बातमी फोटोशूटच्या माध्यमातून देतात. हॉलीवुडमधील हे फॅड आता चित्रपटसृष्टीतही पसरले आहे. आजवर गरोदर झालेल्या अभिनेत्रीच्या पावलावर पाऊल ठेवत बिपाशा बासूनही आपल्या गरोदरपणाची बातमी अशाच काहीशी शैलीत दिली आहे.
एकेकाळी बोल्ड अभियानासाठी गाजलेल्या बिपाशांनी पती करण सिंह ग्रोव्हरसोबत नुकतेच एक फोटोशूट केला आहे. अतिशय बोल्ड दिसणाऱ्या या शूटसाठी बिपाशा आणि करण यांनी पांढरे शर्ट्स परिधान केले आहेत. फोटोत केवळ एकच बटन लावलेल्या उजव्या खांद्यावर ढळलेल्या आणि बेबी बम्ब दाखवणाऱ्या शर्ट मध्ये बिपाशा स्माईल करताना दिसत आहे.


