करमाळा (सोलापूर) : श्रीदेवीचामाळ येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करण्यात आली. सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, विनायक भोसले, वैभव पवार, आदित्य पवार आदींनी याचे नियोजन केले होते. यामध्ये वेगवेगळे बँड पथक व राजे रावरंभा तरुण मंडळ, श्रीदेवीचा माळ येथील लेझीम पथक विशेष आकर्षण होते. यावेळी मिरवणूक काढत शहरातील छत्रपती चौक येथे छत्रपतींच्या शिवस्मारकाला भेट देऊन व विविध कार्यक्रम घेण्यात आले.
श्रीदेवीचामाळ येथील शिवजयंती उत्सव मिरवणुकीचे उद्घाटन सरपंच संतोष पवार व सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष सचिन काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन चोरमले, शिवसेना तालुका उपप्रमुख अंगद बिडवे, माजी सरपंच श्रीराम फलपले, प्रवीण हिरगुडे, प्रभाकर धोंडे, पोलिस पाटील मनोज जामदार, तुषार जगताप, रोहित सोरटे, मनसेचे श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते झाले.