करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर ते श्री देवीचामाळ रस्त्यासाठी पाठपुरावा करून रस्त्याचे काम करून घेतल्याबद्दल भाजपा व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र ठाकुर, प्रकाश क्षिरसागर, निलेश माने, रोहित कोळेकर, राजेंद्र, कल्याण इंदलकर, आश्विन जव्हेरी, जितेश कांबळे, दादा भांडवलकर, विशाल परदेशी, राजाभाऊ क्षिरसागर उपस्थित होते.