करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गुरुवारी (ता. १) व शुक्रवारी (ता. २) करमाळा दौऱ्यावर येणार आहेत. करमाळा शहरासह केम, पांडे, शेलगाव वांगी, चिखलठाण, कोर्टी, वीट येथे भेटी देऊन ते आढावा घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी दिली आहे.
डॉ. लोणकर यांच्या श्री विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्राचे माजी सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते उदघाटन
खासदार नाईक निंबाळकर यांचा करमाळा तालुक्यामध्ये गाव भेट दौरा आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता केम येथून त्यांचा दौरा सुरु होणार आहे. त्यानंतर ते दुपारी 2 वाजता करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय येथील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या शिबिरास भेट देणार आहेत. 3 वाजता ते करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते किल्ला विभाग, गुजरगल्ली येथे भेटी देणार आहेत.
शुक्रवार सकाळी 9 वाजता पांडे येथे जाणार आहेत. वीट, कोर्टी, चिखलठाण व शेलगाव वांगी येथे भेटी देऊन आढावा घेणार आहेत. करमाळा तालुक्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या जिल्हा परिषद गटानुसार व सोयीनुसार वरील दौऱ्यात सहभागी व्हावे. याबरोबर आपल्या भागातील कामासंदर्भात सूचना व निवेदने द्यावीत, असे आवाहन तालुकाध्यक्ष चिवटे व शहराध्यक्ष अग्रवाल यांनी केले आहे.