करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदावरून अचानकपणे सूर्यकांत कोकणे यांची बदली झाली. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. सोशल मिडियावर आमदार संजयमामा शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांकडून ही बदली यांच्यामुळेचे झाली असल्याचे सांगणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. अचानक झालेल्या बदळीमुळे अनेक तर्कवित्रक लावले जात होते. तर काहीनी सरकार बदळल्यामुळे भाजपच्या तक्रारीवरून ही बदली झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. यावर भाजपच्या कार्यकर्त्यानी मात्र कमालीची गुप्तता ठेवली होती. अखेर भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच यावर स्पष्टीकरण दिले आहे.

भाजपचे खासदार निंबाळकर हे दोन दिवसाच्या करमाळा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी (काल) त्यांनी रात्री शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा माजी आमदार नारायण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शंभुराजे जगताप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, किरण बोकण आदी पदाधिकारी उपस्थित होते. खासदार निंबाळकर यांना यावेळी पत्रकारांनी कोकणे यांच्या तडकाफडकी बदलीबाबत विचारले तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिले.
Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम

खासदार निंबाळकर म्हणाले, कोकणे यांच्या तक्रारी यांच्याकडे आल्या होत्या. यावर्षी देशाचा अमृतमहोत्सव साजरा केला गेला. त्यामुळे सर्वत्र विविध कार्यक्रम घेतले जात होते. करमाळ्यात त्यातूनच भाजपकडून रॅली काढण्यात आली होती. मात्र या रॅलीला परवानगी नकरण्यात आली. त्यानंतर मी स्वत: कोकणे यांच्याशी बोललो होतो. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. त्यानंतर कोकणे यांना याबाबत बोललो होतो. कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण त्यांची बदली करण्यासाठी बोललो, असे खासदार निंबाळकर म्हणाले.
