करमाळा (सोलापूर) : ‘गोपालन संस्थेत आल्यानंतर आनंद वाटतो आहे. श्रेणिकशेठ खाटेर कुटुंबीय करत असलेले हे काम खरोखर उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढत हे काम असेच वाढत जाणे आवश्यक असल्याचे मत करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले आहे.
करमाळा येथील गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेमध्ये पोलिस निरीक्षक कोकणे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी गाईंचे पूजन करून बैल पोळा साजरा करण्यात आला. करमाळा- नगर रस्त्यावर ही गोपालन संस्था आहे. दिवसभर गाईंना विविध रंगानी रंगवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी पोलिस, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व महिलांच्या उपस्थितीत गाई पूजनाचा सोहळा रंगला. श्रेणिकशेट खाटेर यांच्यासह त्यांचे सहकारी व गाईंवर प्रेम करणाऱ्या तेथील कामगारांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.

करमाळा तालुक्यात शुक्रवारी बैल पोळा साजरा झाला. दोन वर्ष कोरोनाचे निर्बध होते. त्यामुळे या कार्यक्रमांवरही मर्यादा होत्या. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नव्हते. त्यामुळे सर्वत्र उत्सहात हा सण झाला. गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी पिंटूशेठ गुगळे, रमेश कटारिया, अमृत कटारिया, कचरूलाल मांडलेचा, ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचे पत्रकार अशोक मुरूमकर, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, दिनेश मडके, विजय मांडलेचा, अनिल सोळंकी, जीवनभई संचेती, शंकर रासकर, दिनेश मुथा, वैभव दोशी, केतन संचेती, गणेश बोरा, नीरज गुगळे, प्रकाश मुनोत, आदेश ललवाणी, चंद्रकांत काळदाते, विजय बरीदे, गिरीश शहा, प्रीतम राठोड व अभय शिंगवी उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते खाटेर यांनी संस्थेची माहिती सांगितली. पोलिस निरीक्षक कोकणे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कामाबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर सयोजकांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितानी गाईची पूजा करून पुरण पोळीचा घास भरवण्यात आला. तेथेच उपस्थितांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
