करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोफळज येथे ३२ वर्षाच्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणात करमाळा पोलिसात पतीसह पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे. १ ऑगस्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास बचत गटाची बैठक सुरु असताना हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फिर्यादी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी पत्नीने मारहाण तर तिच्या पतीने विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीने म्हटले आहे की, ‘1 ऑगस्टला रात्री 8 वाजताच्या सुमारास गावातील बचत गटाची बैठक असल्याने गावातील एका व्यक्तीच्या घरी गेले. बैठकी दरम्यान गावातील एकाने उजव्या हाताला धरून ‘मला तु खुप अवडते, माझे तुझेवर प्रेम आहे, तु माझे बरोबर चल’ असे म्हणुन विनयभंग केला आहे. याबरोबर 3 तारखेला संशयित आरोपीची पत्नीने शिवीगाळी करून हाताने मारहाण केली आहे. त्यामुळे त्या दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याचा तपास पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गवळी हे करत आहेत. यामध्ये कलम 354, 354 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.